प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असताना शनिवारी मात्र जिल्हय़ात 57 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. बेळगाव तालुक्यामधील 17 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या गेल्या महिन्याभरापासून कमी झाली आहे. याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढली आहे. आठ दिवसांपूर्वी तर केवळ 2-3 रुग्ण दररोज आढळत होते. यामुळे डॉक्टर व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र पुन्हा कोरोनाबाधितांच्या आकडय़ात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा आता जनतेने सतर्क राहणे गरजेचे आहे.
सध्या 426 जण कोरोनाबाधित असून या सर्वांवर सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.