प्रतिनिधी/ बेळगाव
वकील व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी बार असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत अनेक वकिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना लस देण्यात आली. शनिवारीही तब्बल 270 जणांना लस देण्यात आली. वकील व त्यांच्या कुटुंबीयांनी हा लाभ घेतला.
कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर व बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ यांच्यासह इतर सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या तीन महिन्यांपासून लस देण्याचे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे वकिलांतून समाधान व्यक्त होत आहे.