आरोग्य विभागाला 9 हजार अहवालांची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्ण संख्येतील चढ-उतार सुरूच आहेत. शनिवारी जिल्हय़ातील 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 16 जणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली असून 9 हजार 380 जणांच्या अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 56 वर पोहोचली आहे. यापैकी 25 हजार 495 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या 24 जणांना घरी पाठविण्यात आले असून 219 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 342 जणांचा मृत्यू झाला आहे.
तपासणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी
आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अहवाल सक्तीचे केल्यामुळे तपासणीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होवू लागली आहे. अद्याप 42 हजार 541 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 3 लाख 43 हजार 861 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3 लाख 6 हजार 537 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
शनिवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 14 व ग्रामीण भागातील 2 असे तालुक्मयातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वंटमुरी येथील आयटीबीच्या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सिव्हिल हॉस्पिटलमधील एका डॉक्टर तरुणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. सावगांव, रामलिंगखिंड गल्ली, शांतीनगर, क्लब रोड, अनगोळ, विश्वेश्वरय्यानगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर, टिळकवाडी, बसवणकुडची, निलजी, अजमनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.