बेळगाव / प्रतिनिधी
शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच महाराष्ट्र शाखा बेळगावचे 3 रे शेकोटी कविसंमेलन रविवार दि. 3 रोजी सायंकाळी 6 ते 7 यावेळेत शहापूर, नाथ पै सर्कल येथील सिद्धार्थ फ्री बोर्डींग येथे आयोजित करण्यात आले आहे. बेळगावातील सर्व कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दविद्या समुहाचे कार्याध्यक्ष स्वप्निल जोगाणी यांनी केले आहे. उपस्थितांना मास्क बंधनकारक असून सामाजिक अंतर ठेवून हा कार्यक्रम होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी संदीप मुतगेकर 8722777460, भरमा कोलेकर 8123624450 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.