आतापर्यंत 30 लाख नागरिकांनी सोडला युक्रेन
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर युरोपमध्ये शरणार्थींचा पूर आला आहे. याचा प्रभाव युक्रेनमधील मुलांवरही पडला आहे. युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर यांच्यानुसार युक्रेमध्ये युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख लोकांनी पलायन केले आहे. यातील निम्मी संख्या मुलांची आहे. युद्ध सुरू झाल्यापासून दर मिनिटाला 55 मुलांना शरणार्थी व्हावे लागत आहे. म्हणजेच दर सेकंदाला एक मुलगा शरणार्थी होत आहे.
अनेक मुलांना आई आणि भावाबहिणींसह कठिण प्रवास करावा लागत आहे. आपल्यासोबत नेमके काय घडले हे या मुलांना कसे समजवावे हेच आईवडिलांना कळेनासे झाले आहे. काही मुलांना आपण सुटीवर जात आहोत असे सांगण्यात आले. तर आपले घर सुरक्षित नसून वडिलांना देशाच्या रक्षणासाठी युक्रेनमध्येच रहावे लागेल असे काही मुलांना सांगितले गेले. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या 4.4 कोटी नागरिकांपैकी 30 लाख जणांनी देश सोडला आहे.
9 वर्षीय वेरोनिका लोतोबा युक्रेनच्या डोनबास भागातून बाहेर पडत शेजारी देश पोलंडमध्ये पोहोचली आहे. ती स्वतःसोबत टेडी बियर घेऊन आली आहे. तिच्या कुटुंबाने युद्धापूर्वी वेरोनिकाच्या आजीआजोबांना देशाबाहेर हलविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देश सोडण्यास नकार दिला. आता आजीआजोबा आणि वेरोनिकाचे वडिल बॉम्बवर्षावत वाचणार नसल्याची भीती तिच्या आईला सतावत आहे.
सुमी शहरात राहणारी डायना रशियाच्या सैनिकांनी गोळीबार सुरू केल्याच्या दिवशी 7 वर्षांची झाली. डायनाला वाढदिवसाची रात्र आश्रयगृहात घालवावी लागली. काही दिवसांनी ती आई आणि 11 वर्षीय बहिणीसोबत पश्चिम युक्रेनसाठी एका रेल्वेतून निघाल्या. तिचे वडिल रशियाच्या हल्ल्यात जखमी झाल्याने येऊ शकले नाहीत. युक्रेन लोक पलायन करत बेल्जियममध्ये देखील पोहोचत आहेत. येथील राजधानी ब्रसेल्समध्ये मायग्रेशन ऑफिसबाहेर लोकांची गर्दी दिसून येते. पश्चिमेकडील शहर लीवमधून बसेसद्वारे युक्रेनचे नागरिक शेजारी देशांच्या सीमेपर्यंत पोहोचत आहेत.