मुंबई \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून राज्यातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्राप्त केलेल्या यशाबद्दल ममता बॅनर्जी यांच्यासाठी खास ट्वीट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मिळवलेल्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत शरद पवार यांनी म्हटले आहे की, लोकांच्या भल्यासाठी तसंच कोरोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया.
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मात्र सगळ्यांचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम आहे त्यामुळे पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे.