ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना दिल्लीमध्ये (Delhi) आज मोठी घडामोड झाली. राष्ट्रवादीचे नेते शरद (sharad pawar) पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यात भेट झाली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांची प्रधानमंत्री कार्यालयात (PM Office) भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पवार- मोदी भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातच आत शरद पवार दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद (press conference) घेणार आहेत. त्यामुळे शरद पवार मोदींच्या भेटीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुपारी १२.३० च्या सुमारास शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची प्रधानमंत्री कार्यालयात ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये २० ते २५ मिनिटं चर्चा सुरु होती. या भेटीची माहिती समजताच राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. तर शरद पवार आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोदींच्या भेटीसंदर्भातही बोलणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे पवार- मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पवारांची पत्रकार परिषद सुरु झाल्यावरच समजणार आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांना आणि जनतेला आता पवारांच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता लागून राहिली आहे.