सावंतवाडी/ वार्ताहर-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर व त्यांच्या कुटुंबीयांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध सावंतवाडी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी उभाबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.