ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस गेल्या निवडणुकीत सादर करण्यात आलेल्या शपथ पत्रासंबंधी असून पत्राबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, संपूर्ण देशात केंद्र सरकारचे आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद आहे, अशी खोचक टिप्पणी करत, लवकर या नोटिसला उत्तर देऊ, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, जर वेळेत उत्तर दिले नाही, तर दिवसाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये करण्यात आला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना देखील आयकर विभागाने नोटीस धाडली आहे.