नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील निवास्थानी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकील उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरूवात होणार आहे.
यासोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत काय बोलणी झाली याची माहिती समोर आलेली नाही.