प्रतिनिधी / इस्लामपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे शुक्रवार दि. २२ रोजी वाळवा व शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजता चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी कारखाना कार्यस्थळावर लोकनेते स्व.फतेसिंगराव नाईक यांच्या स्मृतिस्थळाचे उदघाटन व सायंकाळी साडे पाच वाजता कुरळप येथे राजारामबापू साखर कारखान्याने अध्यक्ष पी.आर.पाटील यांचा अमृतमहोत्सवीसत्कार सोहळा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या दोन्ही समारंभास खा.श्रीनिवास पाटील, राज्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,खा. धैर्यशील माने, आ.मानसिंगराव नाईक, माजी खा.राजू शेट्टी, आ.मोहनराव कदम आ.अरुण लाड, आ.सुमनताई पाटील, आ.शेखर निकम हे उपस्थित राहणारआहेत. चिखली येथील समारंभास माजी आ.शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, शाहूवाडी-पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.