प्रतिनिधी /बेळगाव
वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांच्यावतीने शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
सदर कार्यक्रमास सर्व स्तरातील व्यक्ती उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते. प्रमुख वक्ते प्रा. आनंद मेणसे यांनी पवार साहेबांच्या कार्याचा उदाहरणासह आढावा घेऊन कर्तृत्त्वाची ऊर्जा घ्यावी व कार्याला लागावे. तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळीसुद्धा ज्यांचा आदर करतात याचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी कार्याला लागावे. दीपक दळवी यांनी पवार साहेबांच्या समवेत आलेले अनुभव कथन केले. मालोजी अष्टेकर यांनी पत्राचा दाखला देऊन, पवार साहेबांचे चाणाक्षपण ऐकवले.
या प्रसंगी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल देसाई यांनी, विरोधकांच्या टीकेला आपल्या कार्याने उत्तर देणारे पवार साहेब समजून घेऊन आम्ही कार्याला लागू या, असे आवाहन केले. कार्यक्रमास ऍड. राजाभाऊ पाटील, अल्पसंख्याक समितीचे उपसेक्रेटरी इस्माईल मुल्ला, राष्ट्रीय महिला सदस्या रुपा देसाई, प्रकाश मरगाळे, दिगंबर पाटील आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. या कार्यक्रमास राष्ट्रीय महिला सदस्या विभा कश्यप, व्हिक्टर वाझ, दीपक नार्वेकर, आप्पासाहेब नाईक, धनपाल अक्षिमणी, शिवाजी लाड, विनायक पाटील, सुरेंद्र तळवलकर, तुकाराम कांबळे, रणजित शिंदे, प्रभावती भालेकर, मनोज पाटील, आप्पा सप्ले, गोपाळ मेणसे, सुरेंद्र अनगोळकर आदी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन व स्वागत दुर्गेश मेत्री यांनी केले. मंथेरो यांनी आभार मानले.