प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने खासदार शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस राष्ट्रवादी भवन येथे केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकाऱयांनी पवारसाहेबांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आयोजित व्हॅर्च्यूअल रॅलीमध्ये सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्षा पूजा काळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख, सातारा जावली विधानसभा मतदार संघ अध्यक्ष शशिकांत वायकर, कुसूमताई भोसले, उद्धव बाबर, बाळासाहेब शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सातारा शहराध्यक्ष अनिल बडेकर, दिव्यांग सेलचे गणेश किर्दत, सुवर्णा पवार, प्रभावती बेंद्रे, प्रशांत घनवट, सुजाता बावडेकर, रुपाली भिसे, उषा शिंदे, सुनिता शिंदे, मेघा माने, ऍड. रणजितसिंह जगदाळे, किरण गोगावले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.