ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर आज या महिन्यातील दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर बुधवारी शरद पवार नियमित तपासणीसाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गेले होते. तपासणीदरम्यान, त्यांच्या तोंडात अल्सर आढळून आला. आज शस्त्रक्रिया करुन तो अल्सर काढण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून, ते रुग्णालयात आराम करत आहेत. लवकरच ते पुन्हा कामाला सुरुवात करतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.