म. ए. समिती, शिवसेना, राष्ट्रवादीतर्फे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झाला तो लाजीरवाणा आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांच्या घरांवर हल्ला होतो ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी म. ए. समिती व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
शरद पवार यांनी नेहमीच सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी ठामपणे राहून सहकार्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासह केंद्रीय मंत्रिपददेखील भूषविले आहे. अशा या नेत्याच्या घरावर हल्ला झाला आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस, म. ए. समिती व शिवसेना यांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, शिवाजी सुंठकर, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, आर. आय. पाटील, महेश जुवेकर, ऍड. एम. जी. पाटील, बी. डी. मोहनगेकर, अंकुश केसरकर, प्रकाश शिरोळकर, दीपक नार्वेकर, कृष्णा हुंदरे, धनंजय पाटील, सदानंद पाटील, प्रकाश मरगाळे, दिगंबर देसाई, मोतेश बारदेशकर, अमोल देसाई, दुर्गेश मेत्री, के. जी. पाटील, ईश्वर गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.