सात दिवस सक्तीच्या विश्रांतीची सूचना
प्रतिनिधी/ मुंबई
काही दिवसांपूर्वी पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी पुन्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असता त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पवार यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. 15 दिवसानंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाईल. व दुसऱया शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
डिस्चार्जनंतर ते मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले असून त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे, असे आवाहनदेखील नवाब मलिक त्यांनी केले आहे.