वैज्ञानिकांना अत्यंत महत्त्वाचे यश : अचूक अन् प्रभावी लस तयार करण्यास मोलाची मदत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणू महामारीसंबंधी अधिकाअधिक माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणू शरीरात कसा फैलावतो हे जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान शरीरात कुठल्या जीनमुळे विषाणू फैलावतो हे शोधून काढल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
वैज्ञानिकांनी हे कार्य जीन-एडिटिंग टूल (ण्Rघ्एझ्R-ण्as9)च्या मदतीने केले आहे. कोरोना विषाणूला शरीरात फैलावण्यास किंवा तग धरण्यास मदत करणाऱया काही जीनसंबंधी या प्रयोगातून समजले आहे. अध्ययनात वैज्ञानिकांनी काही जीन्सना आफ्रिकन ग्रीन मंकीच्या पेशींमध्ये जोडले होते. या पेशींना कोरोना विषाणूने संक्रमित करण्यात आले. या संसर्गानंतर कुठले जीन विषाणू फैलावणारे आणि कुठले त्याच्या विरोधात लढणारे (अँटी व्हायरल) हे पडताळून पाहण्यात आले आहे.
अध्ययनाचा लाभ
या अध्ययनामुळे मानवी शरीरात हा विषाणू कसा प्रभाव घडवून आणतो, हे समजणार आहे. तसेच संसर्गावरील अत्यंत प्रभावी लस तयार करण्यासही मदत होणार आहे. विषाणू रोखणाऱया जीन किंवा पेशींना सक्रीय करणारी लस तयार करण्याचे काम यामुळे सोपे ठरणार असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हे अध्ययन येल स्कूल ऑफ मेडिसीन, बोर्ड इन्स्टीटय़ूट आणि एमआयटी तसेच हॉर्वर्ड विद्यापीठाने एकत्रिपतणे केले आहे.
बॉडी प्रोटीनची भूमिका
कोरोना विषाणूचे प्रमाण शरीरात वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱया जीन्सचा शोध या अध्ययनात लागला आहे. यात प्रोटीनची भूमिका महत्त्वाची मानली गेली आहे. याचे एक रुप शरीरात विषाणू वाढविण्यास तर दुसरे विषाणूशी लढण्यास मदत करते. अध्ययनानुसार Aण्ं2 रिसेप्टर आणि ण्atपज्sग्ह थ् प्रोटीन संसर्ग फैलावण्यास मदत करतात. तर हिस्टोन प्रोटीन कोरोना संसर्ग वाढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रयोगात आढळून आले आहे.