क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव:
कोरोना या जागतिक महारोगामुळे भयावय परिस्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर शारीरिक व्यायाम करुन आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचा एक भाग आहे. पण सरकारच्या आदेशानुसार सध्या मागील दोन महिने जीम्स, व्यायामशाळा बंद आहेत. त्यामुळे आमच्या सारख्या जीम्स व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. कारण बँकेकडून घेतले कर्ज फेडण्यासाठी जीम्स सुरु करण्याचे आम्ही सरकारला विनंती पत्र पाठविलेले आहे. पण अजून आम्हाला आमचा व्यवसाय सुरु करण्याचा आदेश न आल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी बेळगाव शहर जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष किरण कावळे, उपाध्यक्ष चेतन ताशिलदार, सेपेटरी महेश मोरे, सुरेश धामणेकर उपस्थित होते. अध्यक्ष किरण कावळे म्हणाले, आम्ही हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी बिल्डर्सकडून मोठी जागा भाडय़ाने घेतो. आधुनिक पध्दतीची यंत्रसामुग्री आणतो. यासाठी आम्ही बँकेकडून कर्ज घेतो. या प्रशिक्षणामधून आलेल्या रक्केमेतून जीममध्ये असलेल्या ट्रेनरचा पगार, बँकेचे कर्ज, जिम्सचे भाडे आम्ही कोठून देणार? असा सवालही त्यांनी सरकारकडे केला आहे.
आम्ही लोकप्रतिनिधी, खासदार आणि राज्याच्या मंत्र्यांना व पालकमंत्र्यांना भेट घेवून याबद्दल निवेदन दिले आहे. लवकरात लवकर आम्हाला आमचा व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देवून आच्यावरील संकट दूर करावे, अशी मागणीही यावेळी पत्रकार परिषदेत केली.
सेपेटरी महेश मोरे म्हणाले, सध्या या व्यवसायात अनेक व्यायामपटूनी झेप घेतली आहे. मिस्टर इंडिया झालेल्या माजी शरिरसौ÷वपटूला भंगार विकण्याची पाळी आली आहे. काही शरीरसौ÷वपटू चपातीचा व्यवसाय सुरु केला आहे. काहींनी अनेक मार्गातुन आपले कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या बेळगावमध्ये अनेक व्यवसाय सुरु झाले आहेत. उदा. रिक्षा, मद्य व्यवसाय, बस, किरकोळ विक्री, दुकाने, कपडय़ांची दुकाने यांना परवानगी दिली जात आहे. पण जी शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी गरजेचे आहे तेच बंद ठेवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचे नियम पाळून आम्ही आमचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असून यासाठी तातडीने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी बेळगाव श्री व संघटनेचे उपाध्यक्ष चेतन ताशिलदार म्हणाले, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करुन आम्ही जीम सुरु करण्याचा हेतु आहे. बसमध्ये 30 प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. पण आमच्याकडील जिम्स सुसज्ज असल्यामुळे या कोरोना महामारीचा संसर्ग होणार नाही, याची आम्ही काळजी घेवू आणि सरकारचे नियम काटेकोरपणे पाळू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेला खजिनदार सचिन मोहीते, एम. के. गुरव, प्रेमकांत पाटील, राजकुमार बोकडे, किरण पाटील, कार्तेश कावळे, विनायक पाटील, नागेंद्र मडिवाळ, गौरंग गेंजी, संतोष कालकुंदीकर, प्रवीण कणबरकर, अजय चौगुले, जय कामुले, महेश कदम, जयराज चव्हाण, महेश तळवार, मिथुल उसुलकर, बालाजी चव्हाण, किशोर चौगुले, राहुल हिरोजी, सुनील राहुत, ओंकार मोटार, विनायक कोलकार आदी उपस्थित होते.