सातारा : जावली तालुक्यातील सरताळे येथे अज्ञातांनी शर्यतीच्या बैलाचा पाय तोडून, तसेच त्याची गळफास लावून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला. कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरताळे येथे रविवारी रात्री अज्ञातांनी क्रूरतेने शर्यतीच्या बैलाच्या अंगावर गुलाल टाकला. कुऱ्हाडीने त्याचा एक पाय आणि शेपूट तोडले. त्यानंतर निलगिरीच्या झाडाला गळफास लावून त्याची निर्दयीपणे हत्या केली. शर्यतीच्या बैलाची अशा पद्धतीने अमानुष हत्या करण्याचा जावली तालुक्यातला हा पहिलाच प्रकार आहे. यासंदर्भात अधिक तपास हेडकॉन्स्टेबल घोरपडे करत आहेत.