आज प्रदर्शित होणाऱया ‘बंटी और बबली2’ या चित्रपटातून शर्वरी वाघ अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. आदित्य चोप्रा यांचेच तिला मार्गदर्शन लाभले होते. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये संजय लीला भन्साळी यांना तिने दिग्दर्शनात सहाय्य केले होते. दोन वर्षांपूर्वी तिने वेब सीरिजमध्ये पदार्पण केले होते. याचबरोबर सनी कौशलसोबत कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी’मध्ये ती दिसून आली होती.
शर्वरीने यशराज फिल्म्ससाब्त तीन चित्रपटांसाठी करार केला आहे. मोठय़ा पडद्यावर स्वतःच्या बंटी और बबली2 या सारख्या चित्रपटामधून पदार्पण करणे माझ्यासाठी अत्यंत विशेष आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या ऍक्शन युनिटमध्ये एक क्लॅप ऐडी होते, तेथून इतपर्यंतचा माझा प्रवास रोमांचक राहिला असल्याचे तिने म्हटले आहे. बंटी और बबली 2 या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार देखील दिसून येणार आहेत. शर्वरी वाघ ही महाराष्ट्रातील एका मोठय़ा नेत्याची नातलग असल्याने तिला यापूर्वीच माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली आहे.