बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे. सलमाननं इन्स्टाग्राम अकाउंटवर जंगल सफारीचा आनंद घेतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तो जंगलातील तळय़ात पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. सलमानच्या या दोन फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. सलमानचे चाहते देखील त्यावर भरभरून कमेन्ट करत आहेत.
त्याचे हे फोटो पाहून युझर्स त्यांच्या कल्पकतेनं फोटोवर कमेन्ट करू लागले. सलमाननं शेअर केलेल्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉग कॅप्शनमध्ये लिहिले. काहींनी लिहिलं की, ‘साप चावण्याची याला भीती नाही.’ तर अजून एका युझरनं लिहिलं की, ‘त्यात मासे देखील असतील ते देखील पकडा’ तर आणखी एका युझरनं लिहिलं ’भाईची ही झलक सगळ्यांपेक्षा वेगळी…’ या आणि यांसारख्या अनेक युजर्सनी सलमानचं भरभरून कौतुक केलं.