सिव्हिलमध्ये रोज 4 ते 5 जणांचा मृत्यू, अहवाल आल्यानंतरच शवागारातून मुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. बेळगावबरोबरच आता अथणी तालुक्मयातही रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बाधितांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढतेच आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रोज 4 ते 5 जणांचा मृत्यू होत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे जिल्हय़ातील 6 जणांचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या 45 च्या घरात पोहोचली आहे. अथणी, रामदुर्ग, चिकोडी, तालुक्मयांबरोबरच बेळगाव शहरातील बाधितांचाही यामध्ये समावेश आहे. मंगसुळी (ता. कागवाड) येथील 30 वषीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे तर याच गावातील आणखी एका 62 वषीय वृद्धाचाही मृत्यू झाला आहे.
सुरेबान (ता. रामदुर्ग) येथील 48 वषीय बाधिताचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या नऊहून अधिक जणांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. मात्र, राज्य आरोग्य विभागाने रविवारी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये मात्र जिल्हय़ातील मृतांचा आकडा दोन असल्याचा उल्लेख आहे.
बेळगाव येथील खासगी इस्पितळात रविवारी दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर चिकोडी येथे आणखी एका बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानंतर ते मृतदेह शवागारात पाठविण्यात येतात. स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की आणखी कशामुळे, याची घोषणा केली जाते.
शनिवारपासून सिव्हिल हॉस्पिटल केवळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एक रुग्णवाहिका केवळ मृतदेह नेण्यासाठी ठेवण्यात आली असून जिरॅटिक व कोविड-19 वॉर्डमधील मृतदेह शवागारात पोहोचविण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकंदर परिस्थिती लक्षात घेता रुग्णसंख्येत आणखी वाढ होणार, हे निश्चित आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ व त्यामुळे होत असलेले मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता केवळ सरकार आणि सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहाता स्वत:ची काळजी स्वत: घेणे, सरकारने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी गोष्टींचे पालन करणे, हा एकच कोरोना थोपविण्यासाठीचा प्रभावी उपाय ठरणार आहे. कारण रुग्णसंख्या वाढताच सरकारी व्यवस्था तोकडी पडू लागली आहे, याची जाणीव बाळगली तरच पुढचे एक-दोन महिने सुरक्षित जातील.
महिलेच्या क्हिडिओने खळबळ
दोन दिवसांपूर्वी रडेरहट्टी, ता. अथणी येथील एका 65 वषीय वृद्धाचा सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये तडफडून मृत्यू झाला होता. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बिम्स प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी पूर्ण झाली नाही तोच शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या कागवाड तालुक्मयातील मंगसुळी येथील या 30 वषीय महिलेचा मृत्यूपूर्वीचा तो व्हिडिओ आहे. 24 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये महिला विव्हळतानाची दृश्ये आहेत. खासगी वाहिन्यांमध्ये हा व्हिडिओ झळकल्याने बिम्स प्रशासनावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला मधुमेहाने त्रस्त होती. त्यातच तिला कोरोनाची लागण झाली होती. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. बिम्स प्रशासनाने मात्र याबद्दल अधिकृत खुलासा केला नाही.