शशांकची 2013 मध्ये आलेली होणार सून मी ह्या घरची ही मालिका प्रचंड गाजली आणि या मालिकेतून घराघरात पोहोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला श्री म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, पाहिले न मी तुला ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय, पण शशांक ह्या मालिकेत समरप्रताप या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
शशांक सोबत ह्या मालिकेत माझा होशील ना ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल. पाहिले न मी तुला ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम लग्नाच्या नात्यात अडकण्याआधीच समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते. पाठीवर छुपे वार करणाऱया नीच प्रवफत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे दिसून येईल. पाहिले न मी तुला 1 मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.