बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शशिकला जोल्ले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या नवीन मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री आहेत. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत.
दरम्यान, शशिकला जोल्ले या आधीच्या येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील देखील मंत्री होत्या. त्यांच्याकडे महिला, बालविकास आणि अपंगांच्या सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक खात्यांच्या त्या मंत्री होत्या.