बेंगळूर/प्रतिनिधी
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अण्णाद्रमुकच्या हद्दपार नेत्या व्ही. के. शशिकला यांची बुधवारी तुरूंगातून सुटका करण्यात आली. ददम्यान शशिकला यांच्या सुटकेची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. परंतु कोरोना विषाणूची लागण झाल्याने शशिकला यांच्यावर व्हिक्टोरिया रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान शशिकला यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर एका आठवड्यापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कारणास्तव रुग्णालयातून त्यांची सुटका करण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.
कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
शशिकला यांच्या सुटकेची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी व्हिक्टोरिया हॉस्पिटलबाहेर जमले आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.