शल्यचिकित्सक पदी डॉ. चव्हाण यांची नियुक्ती
प्रतिनिधी/ सातारा
नाशिक येथे कार्यरत असणाऱया डॉ. सुरेश जगदाळे यांना पुन्हा सातारा जिल्हा रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. जिल्हा रूग्णालयाचे प्रभारी शल्यचिकित्सक म्हणून कार्यभार पाहणाऱया डॉ. सुभाष चव्हाण यांची आहे त्याच ठिकाणी आरोग्य विभागाने पूर्णवेळ नियुक्ती केली आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी कार्यरत असणाऱया डॉ. अमोद गडीकर यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी आल्या. या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी गडीकर यांचा कार्यभार काढून घेतला होता. जिल्हा रूग्णालयाची सर्व सूत्रे डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे सोपवली होती. प्रभारी म्हणून काम करणाऱया डॉ. चव्हाण यांची गुरूवारी पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती कायम केली. गडीकर यांच्यापूर्वी जिल्हा रूग्णालयाची सूत्रे डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे होती. कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती आरोग्य विभागाने नाशिक येथे केली होती. या ठिकाणी जगदाळे यांनी उत्कृष्ट काम करत स्वता:च्या नावलैकिक वाढवला होता. आता पुन्हा जिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
याबाबत तरूण भारतशी बोलताना जगदाळे म्हणाले, पूर्वीही सातारा जिह्यात काम केले आहे. त्यामुळे साताऱयात कामाचा अनुभव आहे. रूग्णांना जास्तीत चांगल्या सेवा देण्यावर भर देणार आहे. लवकरच कामावर रूजू होणार आहे.