आईवडिलांनाही पसंत मुलीचा धमाकेदार छंद
8 वर्षीय ऑटम फ्राइ रायफल्स, हँडगन्स आणि फ्लेम थ्रोअर यासारख्या धोकादायक गोष्ठी हाताळताना स्वतःच्या युटय़ूब चॅनेलवर दिसून येते. तिची फॉलोअर्स आणि चाहते लाखांमध्ये असून जे तिचा धोकादायक खेळ पाहतात.
पेन्सिलवेनियात राहणाऱया फ्राइ परिवाराने सुमारे वर्षभरापर्यंत अत्यंत वाईट काळ अनुभवला होता, पण आता त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे. विविध प्रकारच्या बंदुका आणि शस्त्रास्त्रांदरम्यानच ऑटम वाढली आहे. याचमुळे तिला त्यांची भीती वाटली नाही. तिच्या युटय़ूब चॅनेलचे 1 लाख 60 हजार सब्सक्रायबर्स आहेत. हे लोक ऑटमला शस्त्र हाताळताना पाहणे पसंत करतात.
सर्वसाधारणपणे आईवडिल जीवघेण्या शस्त्रास्त्रांपासून मुलांना दूर राहण्याचा सल्ला देतात, पण ऑटमचे वडिल रँडी मुलीच्या बंदुकाबद्दलच्या प्रेमावर खूपच खूश आहेत. कमी वयातच ऑटम बंदुका हाताळण्यास अत्यंत प्रोफेशनल आहे. ऑटम आमच्या भविष्यातील शानदार रोल मॉडेल असू शकते असे ते सांगतात.
7 वर्षे वय असतानाच ऑटमचे व्हिडिओ तयार करण्यास प्रारंभ केला होता. तिला लाखो लोक युटय़ूबवर पाहतात. तसेच इन्स्टाग्रामवरही 43 हजार फॉलोअर्स आहेत असे रँडी यांनी म्हटले आहे. ऑटम शस्त्र हाताळत असताना तिचे वडिल निरीक्षण करत असतात. ज्याप्रकारे युटय़ूब चॅनेलवर मुले खेळण्यांची तुलना करताना दिसून येतात, त्याचप्रकारे ही मुलगी बंदुकांची तुलना करताना दिसून येते. तिच्या चॅनेलवर एकूण 77 व्हिडिओ आहेत, ज्यांना 12 लाख वेळा पाहिले गेले आहे. यात एआर15 पासून फ्लेमथ्रोअरपर्यंत हाताळताना ऑटम दिसून येते.
अत्यंत आत्मविश्वासासह ऑटम कानात हेडफोन घालून सेफ्टी गॉगलसोबत गन लोड करते आणि त्यानंतर समोरील प्रॉपवर निशाणा लावते. उचलता येण्यास अवघड असणारी अनेक शस्त्रास्त्रs तिच्या हातात दिसून येतात. ऑटमचे वडिल रँडी हे अमेरिकेचे भविष्य बंदुकांमध्येच असल्याचे सांगतात.
अमेरिकेत बंदुकांवरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. 2014 साली एका 9 वर्षीय मुलीचे बंदुकीवरील नियंत्रण हटले होते, तेव्हा तिने स्वतःच्या इन्स्ट्रक्चरच्या डोक्यातच गोळी घातली होती. 2017 मध्ये बंदुकीशी संबंधित दुर्घटनेत 12 मुलांचा मृत्यू झाला होता.