वैज्ञानिकांकडून नवा खुलासा : अन्नासाठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवास
मधमाशा विशेष प्रकारचा वेगल डान्स करून परस्परांशी संवाद साधतात हे अनेक जणांना माहित आहे, पण वैज्ञानिकांनी त्यांच्याविषयी नवा खुलासा केला आहे. गावात दिसून येणाऱया मधमाशा शहरी मधमाशांच्या तुलनेत अधिक मेहनती असतात. त्या अन्नाच्या शोधात 50 टक्क्यांपर्यंत अधिक प्रवास करत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
व्हर्जिनिया आणि रॉयल होलोवे युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लंडनमध्ये मधमाशांच्या 20 पोळय़ांचे विश्लेषण पेल. या पोळय़ांमध्ये 2800 वेळा दिसून येणाऱया वेगल डान्सला काळजीपूर्वक पाहिले गेले. मधमाशांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली.
शहरी क्षेत्रात राहणाऱया मधमाशा अन्नाच्या शोधात सरासरी 492 मीटरचे अंतर कापतात. तर ग्रामीण क्षेत्रांमध्ये मधमाशा 743 मीटर अंतरापर्यंत जाऊन अन्न शोधत असल्याचे संशोधनात दिसून आले. शहर आणि गाव दोन्ही ठिकाणी राहणाऱया मधमाशांनी जमा केलेल्या मधात मात्र फारसा मोठा फरक नव्हता. शहरांमधील उद्याने मधमाशांना अधिक मध गोळा करण्यास मदत करतात.
गावातील अधिक मेहनती
शहरांमधील उद्याने मधमाशांसाठी हॉटस्पॉट असतात, कारण तेथे अनेक प्रकारची फुले असतात. तर गावांच्या शेतीयुक्त भागांमध्ये मधमाशांना अन्न शोधण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. याचमुळे त्यांना मोठे अंतरही कापावे लागत असल्याचे उद्गार संशोधक एली लीडबीटर यांनी काढले आहेत.
वेगल डान्स अन् लोकेशन मधमाशा प्रतिदिनी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. जेव्हा त्या मध घेऊन पोळय़ात परतात, तेव्हा अन्य मधमाशांना अन्नाच्या लोकेशनविषयी सांगतात. ही माहिती देण्यासाठी त्या वेगल डान्स करतात. मधमाशाच्या वेगल डान्सला अन्य मधमाशा काळजीपूर्वक पाहतात. यातून कुठल्या दिशेने अन्न उपब्लध आहे आणि ते किती दूर आहे हे यातून त्यांना समजते.