प्रतिनिधी / सांगली
कोरोनामुळे सलग १० महिने शहरातील सर्व उद्याने बंद होती. गेले महिना झाले ही उद्याने आता खुली झाली असल्याने, बालचमू खेळांचा पुरेपुर आनंद लुटण्यात मग्न आहे.
कोरोना काळात मुले टीव्ही, मोबाईल, पुस्तक वाचन, बैठे खेळ खेळून वैतागली होती. सध्या शाळांना अजूनही सुट्टी असल्याने त्यांचे लक्ष आता नवनव्या खेळांकडे लागले आहेत. सुट्टीच्या कालावधीमुळे अनेक मुले सध्या बगिच्यामध्ये, क्रीडांगणे, मोकळ्या मैदानावर बागडताना दिसत आहेत. लहान मुलांच्या वावर वाढल्याने शहरातील बगिचेही फुलून गेले आहेत. शहरातील अनेक ठिकाणी बगिचे मोकळी मैदाने आदी जागी लहान मुलांसाठी नवनविन खेळणी बसवण्यात आल्याने लहान मुले यांचा आनंद लुटताना दिसत आहे.
लहान मुले बगिचांतील खेळण्यांसह बगिचांमधील कारंजे, तेथील हिरवळीवरुन फिरणे, व्यायाम करणे, विविध खेळ खेळणे आदी मध्ये रमलेली दिसून येत आहेत.