प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या दुरुस्तीच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने शहराला पाणीपुरवठा करता येणार नाही. हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा रविवार दि. 2 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे दि. 3 आणि 4 रोजी चोवीसतास पाणीपुरवठा योजनेसह शहरातील संपूर्ण भागातील पाणी पुरवठय़ात व्यत्यय येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पुरवठा महत्त्वाचा आहे. पण रविवारी दुरुस्तीच्या कामामुळे विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया हिंडलगा पंप हाऊसचा विद्युत पुरवठा बंद झाला होता. परिणामी जलाशयामधून करण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. परिणामी दोन दिवस पाणी पुरवठय़ात व्यत्यय येणार असल्याने शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटीतर्फे केले आहे.