प्रतिनिधी/ रत्नागिरी :
शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे 360 डिग्रीमध्ये फिरणारे पॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. याचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते. या अत्याधुनिक पॅमेराद्वारे शहरातील मारुती मंदिरपासून सुमारे जुना माळनाकापर्यंत अंतरावर लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर याद्वारे कारवाई केली जाणार आहे. नाक्यावर पोलीस नसले तरी वाहनचालकांना शिस्तीतच जावे लागणार आहे. हळूहळू अशा पद्धतीने शहराच्या मुख्य नाक्यांवर हे पॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे गुह्यांची उकल करण्यासही पोलिसांना मदत मिळणार आहे. सीसीटीव्ही बेस ई-चलनाची सोय आहे. शहरात 12 ठिकाणी असे पॅमेरे बसवले जाणार आहेत.