विद्युत उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी दुरुस्ती अभियान
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ापूर्वी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत तीन दिवसात बेळगाव शहरातील 310 ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील धोकादायक ट्रान्स्फॉर्मर शोधून त्याची दुरुस्ती केली जात आहे.
ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या पडणे, तेल गळती, आवाज येणे असे प्रकार वारंवार घडतात. बऱयाचवेळा व्होल्टेज कमी-जास्त झाल्याने विद्युत उपकरणांचे नुकसान होते. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती अभियान सुरू केले आहे. शहर उपविभाग 1, 2 व 3 अंतर्गत येणाऱया ट्रान्स्फॉर्मरची नोंद करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने याची दुरुस्ती केली जाणार आहे.
ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती अभियान
राज्य सरकारकडून ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीसाठी 5 ते 15 मे दरम्यान अभियान हाती घेण्यात आले आहे. बेळगाव शहरातील ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीला सुरूवात करण्यात आली असून, आतापर्यंत 310 ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करण्यात आले आहेत.
– एम. टी. आप्पण्णावर (कार्यकारी अभियंता)