दोन्ही घटनांत अज्ञात आठ जणांच्यावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील शुक्रवार पेठेतल्या भगीरथ अपार्टमेंटच्या समोर आसनगाव कुमठेच्या युवकास सहा जणांनी मारहाण केल्याची घटना दि. 7 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एकाने धारधार शस्त्राने वार केल्याने जखमी झाला असून जखमी युवकाचे नाव अमोल प्रकाश पवार (वय 35) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर हॉर्न दिल्याच्या कारणावरुन असरार अकबर पालकर (वय 28, रा. गुरुवार परज) याच्यावर दोघांनी चाकू हल्ला केला. एकाच दिवशी शहरात दोन चाकू हल्ल्याच्या घटना घडल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. दोन्ही घटनांची नोंद पोलीस स्टेशनला झाली असली तरी फिर्यादीने अधिक माहिती न दिल्यामुळे अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार ते शुक्रवार पेठेत त्याचे सलुनचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी 4 वाजता दुकान बंद केले. नजिकच्या अण्णा मिस्त्राrसोबत बोलत बसला होता. अचानक दोन दुचाकीवरुन सहा अनोळखी युवक आले. त्यांनी पाठीमागून धारधार शस्त्राने वार केला. त्यानंतर अमोल पवार हा अचानक झालेल्या हल्याने बचावासाठी पळून जावे लावू लागले. तेव्हा पळून जाताना खाली पडले. मारहाण करणारे पळून गेले. अमोल पवार हा कसाबसा दुचाकीवरुन मित्र सचिन साळुंखे याच्या घरी जखमी अवस्थेत गेला. त्यावेळी मित्र सचिन घरी नव्हता. त्यानंतर अमोल पवार याने घडलेला प्रकार त्याचा भाऊ रवी पवार यास फोन करुन बोलवून घेतले. त्याने अमोल यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हॉर्न दिल्याच्या कारणावरुन युवकावर चाकू हल्ला
सातारा तहसील कार्यालयाच्या गेटमधून बाहेर येणाऱया युवकावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार केल्याची घटना दि. 7 रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणाची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, असरार अकबर पालकर (वय 28, रा. गुरुवार परज) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटच्या समोर गाडी घेवून निघाला होता. त्याने हॉर्न दिल्याच्या कारणावरुन अनोळखी दोन जणांनी चिडून जावून शिवीगाळ करत खिशातील चाकूने खांद्यावर व डाव्या बगलेत वार करुन जखमी केले. तसेच जमिनीवर पडलेला दगड घेवून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे हे तपास करत आहेत.