इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
समाजातील उपेक्षितांना स्वावलंबी होऊन अर्थार्जन करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने तृतियपंथी व्यक्तींना फूड कार्ट (टपरी) उपलब्ध करून दिली. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी इनरव्हीलच्या डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन रत्ना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तृतियपंथियांची संघटना असणाऱया हय़ुमॅनिटी फौंडेशनच्या सदस्यांशी इनरव्हील क्लबच्या सदस्यांची भेट झाली. त्यावेळी आपल्या समाजातील व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी क्लबने मदत करावी, अशी विनंती फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी यांनी केली होती. त्यानुसार क्लबच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी आणि सर्व पदाधिकाऱयांनी निधी संकलित करून फूड कार्ट उपलब्ध करून दिला.
बुधवारी सकाळी किल्ल्यानजीक असणाऱया इंदिरा कॅन्टीनजवळ हे फूड कार्ट सुरू करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या प्रवक्त्या किरण बेदी, महेश, मिलिंद तसेच सचिव डॉ. सविता कद्दू आदी उपस्थित होत्या.