मोजक्याच मानकऱयांच्या उपस्थितीत सिमोल्लंघन कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वर्षाप्रमाणे यावषीही दसऱयानिमित्त साध्या पद्धतीने सिमोल्लंघन साजरे करण्यात आले. कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा झाला. बेळगाव शहर परिसरातील विविध देवदेवतांच्या पालख्या या मैदानावर आल्यानंतर मोजक्मयाच मानकऱयांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
शहर देवस्थान मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा झाला. चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी व नंदी दसरोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. याचबरोबर इतर पालख्याही टप्प्याटप्प्याने सिमोल्लंघन मैदानावर जमा झाल्या. चव्हाट गल्ली येथील नंदीने सिमोल्लंघन केल्यानंतर उपस्थितांनी सोने लुटले.
यावेळी शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, आमदार अनिल बेनके, परशराम माळी, विजय तमुचे, प्राचार्य आनंद आपटेकर, लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार यांच्यासह विविध पालख्यांचे मानकरी सहभागी झाले होते.
कॅम्प येथील रथांची प्रदक्षिणा
कॅम्प येथे वैविध्यपूर्ण असा दसरोत्सव साजरा केला जातो. यावषीदेखील आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या रथांमधून मिरवणूक काढण्यात आली. मुत्तूमरिअम्मा, मरिअम्मा, कुंतीदेवी, महालक्ष्मी तुलकनमा, दुर्गामाता-मरिमाता या देवींच्या मूर्ती रथांमध्ये ठेवून त्यांची कॅम्प परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये तरुणांनी केलेल्या विविध राक्षसांच्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.
कपिलेश्वर मंदिरात हलगीवादन
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात विजयादशमीनिमित्त शुक्रवारी अकलूज येथील हलगीवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कपिलेश्वर मंदिरापासून रेणुकादेवी मंदिरापर्यंत हलगीवादन करत पालखी सोहळा काढण्यात आला. आकर्षक पद्धतीने केलेले हलगीवादन पाहण्यासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते.