चौघांचा मृत्यू
एकूण 32 रुग्ण झाले बरे
तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहरात सोमवारी 49 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ग्रामीणमध्ये 16 रुग्ण आढळले. शहरात 3 जणांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एक बळी गेला. तसेच उपचार घेऊन बरे झालेल्या शहरातील 12 जणांना घरी सोडण्यात आले तर ग्रामीणमधील 20 जणांना घरी पाठविण्यात आले.
सोलापूर शहरात सोमवारी 227 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह 178 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 49 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 37 स्त्रिया तर 12 पुरुषांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 654 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 9500
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 1654
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 139
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या ः 690
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ः 825
प्राप्त तपासणी अहवाल ः 9330
प्रलंबित तपासणी अहवाल ः 170
निगेटिव्ह अहवाल ः 7676
ग्रामीणमध्ये 16 जणांना बाधा, एकाचा मत्यू
सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात नव्याने 16 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णांमध्ये 8 पुरुष, 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा तर आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 20 तर आतापर्यंत 58 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिह्यातील ग्रामीण भागात एकूण 133 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 64 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सोमवारी दिली.
मयत व्यक्ती 77 वषीय अक्कलकोट तालुक्मयातील करजगी येथील रहिवासी आहे. 13 जून अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी 1, नवीन विडी घरकुल 2, अश्विनी रुग्णालय कुंभारी 2, करजगी 1, पारधी वस्ती मुळेगाव तांडा 8, भोजप्पा तांडा (उत्तर सोलापूर) 1, बगले बरड (बार्शी) 1 इतके रुग्ण आढळले आहेत. आज 95 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 16 पॉझिटीव्ह तर 79 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 22 अहवाल प्रलंबित आहेत. 133 रुग्णांपैकी 81 पुरुष 52 स्त्री आहेत. तालुक्मयात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 58 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची आतापर्यंतची संख्या
अक्कलकोट – 16
बार्शी – 20
माढा- 7
माळशिरस – 4
मोहोळ- 5
उत्तर सोलापूर – 10
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 61
एकूण – 133