प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमच्या विद्युत उपकेंद्रांमध्ये दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे रविवार दि. 3 रोजी शहर व तालुक्मयातील काही भागामध्ये वीजपुरवठा ठप्प होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पहिला, दुसरा, तिसरा व चौथे स्टेज हनुमाननगर, कुवेंपुनगर, बॉक्साईट रोड, सहय़ाद्रीनगर, बुडा स्कीम क्र. 41 व 51, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी पाणीपुरवठा, हिंडलगा गणपती देवस्थान, महाबळेश्वरनगर, वंटमुरी कॉलनी, श्रीनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, संगमेश्वरनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, चन्नम्मा सर्कल, डीसी ऑफिस कंपाऊंड, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, कॉलेज रोड, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी औद्योगिक वसाहत, केएमएफ डेअरी परिसर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, ईएसआय हॉस्पिटल, वीरभद्रनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, शिवबसवनगर, सुभाषनगर, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, सिव्हिल हॉस्पिटल, हिंदवाडी, खानापूर रोड, काँग्रेस रोड, पहिला रेल्वेगेट, दुसरा रेल्वेगेट,
व्हॅक्सिन डेपो, लेले ग्राऊंड, राणाप्रताप रोड, हिंदूनगर, सावरकर रोड, नेहरु रोड, रॉय रोड, कॅम्प मिलिटरी एरिया, न्यू गुडस्शेड रोड, शास्त्रीनगर, एपीएमसी रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, मराठा कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी, सराफ गल्ली या परिसरात वीजपुरवठा ठप्प राहणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.