विविध मंदिरांसमोर भक्तांनी दर्शनासाठी लावल्या होत्या रांगा
प्रतिनिधी /बेळगाव
श्रावणमास म्हणजे भक्तीभावाने साजरा करणारा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये सोमवारसह इतर दिवशीही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. सोमवारी तर अधिकच गर्दी असते. शहर आणि परिसरात चौथा श्रावण सोमवार भक्तीभावाने साजरा केला.
सोमवारानिमित्त शहरातील सर्व शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विशेष म्हणजे यंदा भाविकांना शिवमंदिरात जाऊन दर्शन घेता आले. अर्थात मंदिर व्यवस्थापन समितीने कोविड-19 चे नियम पाळूनच दर्शनाची मुभा दिली आहे. त्या नियमांचे पालन करत चौथ्या सोमवारीही भक्तांनी दर्शन घेतले.
शहरातील दक्षिणकाशी असे महत्व लाभलेल्या कपिलेश्वर मंदिरात सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे अभिषेक करण्यात आला. मंदिरासाठी अनेक भाविक देणगी देतात. परंतु ते आपले नाव जाहीर करु इच्छित नाहीत. दिवसभर भाविकांची गर्दी कायम राहिली. मात्र सर्व नियम पाळून स्त्राr आणि पुरुष यांच्यासाठी वेगळय़ा रांगा करुन व्यवस्थापन समितीने काळजी घेतली. सायंकाळी 7 वाजता पालखी सेवा झाली. त्यानंतर महाआरती झाली.
श्रावण सोमवारच्या निमित्ताने मंदिराची विशेषतः गाभाऱयाची फुलाने सजावट करण्यात आली होती. कपिलेश्वर मंदिराबरोबरच मिलीटरी महादेव मंदिरामध्ये सुध्दा श्रावण सोमवारनिमित्त महादेव पिंडीची फुलाने सजावट करण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन भाविकांना दर्शन घेतले. शिवमनगर येथील शिवालय मंदिरामध्ये भक्तांनी गर्दी केली होती. शहरामध्ये असलेल्या विविध ठिकाणी सिध्देश्वर, कलमेश्वर, ब्रम्हलिंग यासह इतर मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली.
बिस्कीट महादेव येथील शिवमंदिरात सुध्दा विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शिवपिंडीची तसेच गाभाऱयाची फुलांनी सजावट करण्यात आली होती. अनगोळ येथील श्री कमलेश्वर मंदिर येथेही सोमवार भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिराबाहेर बसलेल्या विपेत्यांनी बेलपाने, श्रीफळ, फुले यांचे स्टॉल मांडले होते. अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी संबंधित ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.