प्रतिनिधी/ बेळगाव
बहीण-भावाच्या तरल आणि तितक्मयाच उत्कट अशा नात्याची वीण दृढ करणारी भाऊबीज शहरात हौसेने साजरी झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच काही निर्बंध हटविण्यात आल्याने यंदा भावा- बहिणींना परस्परांकडे जाता आले. परगावाहून येणेसुद्धा शक्मय झाले. त्यामुळे दोघांच्याहीदृष्टीने ही भाऊबीज विशेष आनंदाची होती.
या दिवशी बहीण भाऊरायाला हक्काने ओवाळते. मोबदल्यात भेटवस्तू हक्काने मागून घेते. त्याच्या समृद्धीची कामना करते. निरामय प्रसन्नतेसह तेजाने उजळून निघालेली व वाजत-गाजत आलेली दिवाळी भाऊबीजेच्या भाऊ-बहिणीच्या प्रेमात न्हाऊन निघाली. बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणाऱया या दिवसासोबत दिवाळीची सांगता होते. परंतु काही कुटुंबांमध्ये भाऊबीजेनंतर बहीणतीज साजरी केली जाते, जेथे भाऊ बहिणीचे औक्षण करतो. कर्नाटकातील काही गावांमध्ये ही परंपरा आजही कायम आहे.