प्रतिनिधी / बेळगाव
’अखंड सौभाग्य लाभू दे’ याबरोबरच कोरोनाचे संकट एकदाचे कायमचे टळू दे… अशी प्रार्थना करत महिलांनी गुरुवारी शहर परिसरात वटपौर्णिमा साजरी केली. या निमित्ताने परस्परांना भेटता आल्याचा आनंद महिलांसाठी अधिक होता.
लॉकडाऊन पुन्हा कधी जाहीर होईल याची खात्री नसल्याने महिलांनी दोन-तीन दिवसांपासूनच वटपौर्णिमेच्या पूजेची सर्व तयारी सुरू केली होती. वटसावित्रीचा पूजेच्या कथेचा याबरोबरच पूजेच्या साहित्याचे दौंड खरेदी केले. ज्यामध्ये फणी, हळद-कुंकू, मणी मंगळसूत्र आणि जोडवी, वडाला गुंडाळण्याचा धागा असे साहित्य होते. सकाळी उठून महिलांनी घरी वटपौर्णिमेचा पट मांडून त्या समोर आंबे, फणसाचे गरे, जांभळे, पान-सुपारी, केळी ठेऊन मनोभावे पूजा केली. यासोबतच वडाच्या फांदीची पूजा केली. त्यानंतर महिलांनी ठिकठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावर जाऊन सात प्रदक्षिणा घालून वडाला धागा गुंडाळला. सात जन्मी हाच पती लाभू दे या अर्थाने या सात प्रदक्षिणा केल्या जातात. महिलांनी बऱयाच महिन्यांनंतर रेशमी साडय़ा तिजोरीतून बाहेर काढल्या. साडय़ा नेसून दागिने घालून प्रामुख्याने नथ घालून महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. यामुळे समादेवी गल्ली येथील वडाचा पार, कॅम्प परिसरातील वटवृक्ष, व्हॅक्सिन डेपो येथील वटवृक्ष, संगोळ्ळी रायण्णा चौकातील सोन्या मारुती मंदिराकडील वटवृक्ष, क्लब रोडवरील वटवृक्ष अशा सर्व ठिकाणी महिलांची लगबग दिसून आली.
लॉकडाऊन खुले झाल्याने महिलांना परस्परांना भेटता आले. त्या आनंदात महिलांनी वटवृक्षाजवळ पूजेसाठी आलेल्या सर्व महिलांची हळद-कुंकू देऊन ओटीसुद्धा भरली. ‘सात जन्मी हाच पती लाभू दे’ अशी प्रार्थना करतानाच कोरोनाचे संकट कायमचे टाळू दे ही प्रार्थनासुद्धा महिलांनी केली.
शहर परिसरात वटपौर्णिमा साजरी
शहर परिसरात गुरुवारी वटपौर्णिमा मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. पतीच्या रक्षणाबरोबर त्याला दीर्घायुष्य लाभावे, याकरीता सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या व्रताचे पालन करून पूजन केले. शहापूर गोवावेस येथील रामलिंगवाडी गणेश मंदिरजवळील वटपौर्णिमेसाठी महिलांची गर्दी झाली होती. कोरोना नियमांचे पालन करत सुवासिनीनी वटपौर्णिमा साजरी केली. सकाळी येथील गणपती मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या कामासाठी शहर परिसरातील वडाच्या झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे मोजक्मयाच ठिकाणी असलेल्या वडांच्या झाडाभोवती महिलांची गर्दी झाली होती.
कंग्राळी-गौंडवाड परिसर
कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरामध्ये गुरुवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पती हे प्रत्येक स्त्राrचे सौभाग्यलेणे असते.
गुरुवारी सुवासिनंनी नटूनथटून हातात हिरवा चुडा, अंगावर दागिने परिधान करून वटवृक्षाच्या झाडाला सुताच्या धाग्यासह सात प्रदक्षिणा घालत पतीबद्दलच्या आपल्या भावना मनोमनी क्यक्त केल्या.