महिना उलटला तरी हेस्कॉमचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
महिना उलटला तरी शहर व तालुक्मयातील वीज मीटरचा तुटवडा अद्याप सुरूच आहे. वितरकाकडून योग्य प्रमाणात वितरण होत नसल्यामुळे ग्राहकांना मीटरची प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. पैसे भरूनही मीटर मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे नवीन घरांचा शुभारंभ रखडला असल्याने दररोज ग्राहक रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात येऊन चौकशी करीत आहेत.
घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरुपी मीटर देण्यात येतो. परंतु कायमस्वरुपी मीटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. दिवाळीपासून हळूहळू ही समस्या भेडसावू लागली आहे. हेस्कॉमकडे मीटरसाठी पैसे भरूनदेखील मीटरची प्रतीक्षा करावी लागत आहे. मीटर उपलब्ध आहेत का, हे पाहण्यासाठी ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. एका कंपनीकडे मीटर वितरण करण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याने हेस्कॉमकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
…तर आंदोलनाचा इशारा शहर व तालुक्मयासाठी एकाच ठिकाणी मीटरचे वितरण केले जाते. यामुळे बऱयाचवेळा मीटर मिळणे अशक्मय होत होते. यासाठी बेळगाव इलेक्ट्रीक कंत्राटदार असोसिएशनने तालुक्मयाला स्वतंत्र वितरक नेमण्याची मागणी केली होती. असोसिएशनतर्फे वितरण करण्यास तयारीही दर्शविली होती. परंतु त्याला हेस्कॉम प्रशासनाने परवानगी दिली नाही. सध्या मीटरचा तुटवडा असल्याने याचा सर्वाधिक फटका कंत्राटदारांना बसत असल्याने वितरण सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा कंत्राटदार असोसिएशनने दिला आहे.