प्रतिनिधी/ सातारा
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन चोरीच्या व एका वाटमारीच्या घटनेचा पर्दाफाश सातारा शहर पोलिसांनी केलेला आहे. चोरीच्या दोन्ही गुह्यातील संशयितांना अटक केली आहे तर जबरी चोरी प्रकरणी एकास अटक केली आहे. असे चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. घरफोडीच्या गुह्यात सुरज राजू माने (रा. लक्ष्मीटेकडी) तर जबरी चोरीच्या गुह्यात सुरज बाळू लोंढे (रा. प्रतापसिंहनगर) याला अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 15 जुन 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महिंद्रा हॉटेल खेड (ता. सातारा) येथे दोन अनोळखी व्यक्तींनी परप्रांतिय युवकास मारहाण करुन त्याच्या जवळील 10 हजार रुपये रोख व ड्रील मशीन असे साहित्य जबरदस्तीने चोरी करुन पळुन गेले होते. या गुह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे या गुह्यातील अनोळखी दोन व्यक्तींचा शोध घेत असताना प्रतापसिंहनगर खेड येथून एका संशयितास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगून चोरी केलेली ड्रील मशीन व गुह्यात वापरलेली दुचाकी असा 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. तो गुन्हय़ाकामी जप्त करण्यात आला आहे. जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तसेच दि. 15 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एमआयडीसी परिसरात घडलेल्या गुह्याच्या अनुषंगाने गोपनिय माहितीनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील प्रतापसिंहनगर ते संगमनगर कॅनॉलजवळ थांबून एक संशयित महिला साहित्य घेवून जात असताना थांबवून तिच्याकडे गुह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्या महिलेने तिच्या साथीदार महिलेच्या सोबतीने जयहिंद फर्निचर एमआयडीसी सातारा येथील फर्निचर दुकान फोडून दुकानातील साहित्य चोरी केल्याचे सांगितले. त्या महिलेकडून 30 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुह्यातील अनोळखी संशयित महिलेचा शोध घेवून गुह्यातील आरोपीचा शोध घेतला आहे.
तसेच दि. 13 रोजी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हे सातारा परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की लक्ष्मीटेकडी सदरबाजार परिसरात घरफोडी करणारा संशयित व्यक्ती आहे. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचाऱयांनी लक्ष्मीटेकडी सदरबाजार सातारा परिसरात त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून शोध घेतला असता लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी येथील पत्र्याचे घर फोडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून 6 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. असे तीन गुन्हे शहर पोलिसांनी उघकीस आणले असून या गुह्यातील 69 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल व संशयितांना जेरबंद केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर. कडव, गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, शिवाजी भिसे, संदीप आवळे, अमृत वाघ, पो. कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला होता.