प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर पोलीस ठाण्यात हद्दीत गेल्या काही दिवसापासून बेवारस उभी असणाऱया वाहनांचा शुक्रवारी लिलाव करण्यात आला. यामध्ये 73 मोटार सायकल व एक चारचाकी गाडी होती. यातील 7-8 वाहनचालकांनी गाडीवर मालकी हक्क दाखवून गाडय़ा नेल्या आहेत. इतर ही पोलीस ठाण्याच्या आवारात असणारी बेवारस वाहनांचा लिलाव करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक बेवारस वाहने सापडत असतात. ही वाहने आणून पोलीस ठाण्यात च्या आवारात लावली जातात. गेल्या अनेक वर्षापासून अशा 73 मोटर सायकल आणि एक चारचाकी गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात धूळखात पडलेल्या होत्या. तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली होवून शहर पोलीस ठाण्याचे नवे कारभारी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी चार्ज घेतला. त्यांनी चार्ज घेवून 4-5 महिने झाले असून पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस उभ्या असणाऱया गाडय़ांची त्यांनी यादी बनवायला लावली. वाहनधारकांना आवाहन करून गाडय़ावर मालकी हक्क दाखवून नेण्याचे आवाहन ही त्यांनी केले. यातील 7-8 वाहनधारकांनी मोटर सायकल नेल्या आहेत. परंतु इतर वाहनांचा लिलाव करण्यात आला. सरकारी किंमत पावने दोन लाख रूपये होती. लिलावामध्ये 2 लाख 40 हजार रूपये इतकी किंमत आल्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी सांगितले.