व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल, गैरसमज न पसरविण्याचे पोलिसांचे आवाहन
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील मारूती मंदीर परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी लूटमारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आह़े याप्रकरणी दुचाकीचालकाने एक व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल केला आह़े दरम्यान पोलीस जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपले काम करत आहेत़ त्यांना बदनाम करून गैरसमज पसरवू नये असे आवाहन वाहतूक पोलीस निरिक्षक शिरिष सासने यांनी केले आह़े
रविवारी सोशल माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ नुसार संबंधित दुचाकी चालक हा मारूती मंदीर परिसरातून जात होत़ा यावेळी वाहतूक पोलिसाने या दुचाकीचालकाला अडविल़े त्याच्याकडे कागदपत्रे व तोंडाला मास लावले नसल्याबाबत विचारल़े मात्र मी हॅल्मेट घातले असल्याने मास्क लावला नाही असे स्पष्टीकरण या दुचाकी चालकाने दिल़े मात्र या उत्तराने समाधानी न झाल्याने वाहतूक पोलिसांनी मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केल़ी
या दंडात्मक कारवाईन संतत्प झालेल्या दुचाकी चालकाने एक व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल केल़ा त्यामध्ये आपल्याविरूद्ध कशी अन्यायकारक कारवाई करण्यात आल़ी तसेच पोलीस कर्मचारी देखील विनामास्क आपल्याशी बोलत होता असा दावा या तरूणाने व्हिडीओमध्ये केला आह़े दरम्यान हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होताचा एकच खळबळ उडल़ी याप्रकरणी वाहतूक पोलीस निरिक्षक शिरिष सासने यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आह़े
जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशाप्रमाणेच कारवाई – शिरीष सासने (वाहतूक पोलीस निरिक्षक )
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशाप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आह़े ही कारवाई म्हणजे लुटमारी नाही हे समजून घ्याव़े व्हायरल व्हिडीओमध्ये वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार हे कारवाई दरम्यान चेहऱयावरील मास्क नाकावरून थोडा खाली असल्याबाबत दुचाकी चालकाची तक्रार आह़े याची दखल घेवून कारवाई करताना नागरिकांशी सौजन्याने वागावे अशा सूचना कर्मचाऱयांना करण्यात आल्या आहेत़ संबंधित व्हिडीओमध्ये वाहतूक पोलिसाने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केलेले नाह़ी त्यामुळे पोलिसांबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवू नये असे आवाहन सासने यांनी केले आह़े