प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात शुक्रवारी कोरोनाचा शिरकाव झाला. एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने हे कार्यालय सीलडाऊन करण्यात आले. यामुळे विद्युत कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 3 दिवस हे कार्यालय बंद ठेवण्यात येणार असून सोमवारी कार्यालय खुले करण्यात येणार आहे.
शहर उपविभाग 1 कार्यालयातील एका कर्मचाऱयाला कोरोना झाल्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी मिळाला. त्यानंतर वरि÷ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यालयात आलेले कर्मचारी व ग्राहकांना माघारी पाठविण्यात आले. शुक्रवारपासून रविवारपर्यंत कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.
बिल भरणा केंद्रही राहणार बंद
रेल्वेस्टेशन समोरील कार्यालयात शहर उपविभाग 1 व 2 मधील बिल भरणा केंद्र (एटीपी सेंटर) आहे. कोरोना रुग्ण सापडल्याने हे केंद्रही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन विजेचे बिल भरावे लागणार आहे. अन्यथा सोमवार दि. 3 रोजी कार्यालयात जावून बिल भरावे लागणार आहे.
विभागीय कार्यालयातही एका कर्मचाऱयाला कोरोना
वीजपुरवठा करणाऱया हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. नेहरुनगर येथील विभागीय कार्यालयातील एका कर्मचाऱयाला देखील कोरोनाची लागत झाली आहे. यामुळे कर्मचाऱयांनी धास्ती घेतली आहे. बाहेरून येणाऱया कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे.