रेल्वे स्टेशन येथील शहर हेस्कॉमच्या कार्यालयात गुरुवारी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक मीटर रीडर तर एक कार्यालयातील कर्मचार्यांला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तातडीने कार्यालय सीलडाऊन करण्यात आले आहे. सदर कार्यालय सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून हे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना कोरोनाची लागण प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती वाढली आहे.
Trending
- संगणक उतारे वितरणासाठी सूचना करा
- कारवार भाजप प्रचाराची सुरुवात यल्लापूरमधून
- काँग्रेस रोडवरील पदपथांना झुडपांचा विळखा
- प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखानदारांना सूचना
- उपनोंदणी अधिकारी विष्णूतीर्थ पुन्हा रुजू
- नायकोलनजीक भाजीचा टेंपो उलटून क्लीनर जखमी
- मजगावात पंधरा दिवसाआड पाणी
- बसवण कुडची यात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ