आठवडी बाजारात मोबाईल-पर्स लांबविण्याचे प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याबरोबरच पाकिटमारी व पर्स लांबविण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. सराफ गल्ली येथे आठवडी बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली आहे.
सराईत चोरटय़ांचा सुळसुळाट वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी खासबाग आठवडी बाजारात पाकिटमारी, मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. महिलांच्या पर्स लांबविणे व दागिने पळविण्याचे प्रकारही घडले आहेत. आता सराफ गल्ली परिसरात या घटना सुरू झाल्या आहेत.
शनिवारी भाजी आणण्यासाठी आलेल्या एका युवकाच्या खिशातील 15 हजार रुपयांचा मोबाईल चोरटय़ांनी पळविला आहे. यासंबंधी संबंधितांनी शहापूर पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी बाजारपेठेत मोबाईल चोरणाऱया चोरटय़ांच्या मुसक्मया आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबरोबरच बाजारात जाताना नागरिकांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.