प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर-आचार्य गल्ली, गाडेमार्ग येथील श्रीराम मंदिरात तुकाराम बीजनिमित्त सोमवार दि. 29 ते 30 मार्चपर्यंत तुकाराम गाथा पारायण सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता ता. पं. सदस्य ह.भ.प. लक्ष्मण बन्नार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मूर्तीचे पूजन ह.भ.प. कुश महाराज नार्वेकर यांच्या हस्ते तर वीणापूजन ह.भ.प. लव महाराज नार्वेकर यांच्या हस्ते झाले.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज काकडे यांनी संत तुकाराम मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. दुपारी 3 ते 3.30 पर्यंत नामजप, त्यानंतर 5 वाजेपर्यंत ह.भ.प. बसू स्वामी हिरेमठ यांच्या अधि÷ानाखाली तुकाराम गाथेचे पारायण झाले. 5.30 नंतर शंकर महाराज राठोड यांचे प्रवचन झाले. सायंकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत खासबागच्या पाटील गल्ली मंडळाचे भजन झाले.
याप्रसंगी सतीश मुतकेकर, वैजनाथ उच्चुकर, मोहन मेलगे, महादेव भेगणे, सोमनाथ पाटील, राजेंद्र हंडे, कुट्रे आदी उपस्थित होते.