ऑनलाईन टीम / मुंबई :
शहापूर येथील एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी लागली असल्याची माहिती मिळाली आहे. शहापूर तालुक्यातील वेहळोली आसनगाव फाटा येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा प्रमोशन कंपनीला ही आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, ही आग विझवण्यासाठी जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही आग धुमसत आहे.
दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले असून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. आगीचे लोळ दूरपर्यंत पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.