प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहापूर येथील धान्य व किराणा दुकानदारांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शुक्रवार दि. 7 पासून 16 ऑगस्टपर्यंत शहापूर येथील दुकाने सायंकाळी 6 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
17 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. 8 नंतर दुकाने बंद असणार आहेत. सर्व व्यापाऱयांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. शहापूर येथील वसंत स्टोअर्सच्या माडीवर घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी राहुल जाधव, महेश तेरणी, विनोद मयेकर, रमेश तेरणी, विजय कामत, आनंद वेलंगी, उदय मुतगेकर, वर्धमान अनगोळकर, प्रकाश मुतगेकर, विकास शिंदे, श्रीकांत मुतगेकर यांच्यासह इतर व्यापारी उपस्थित होते.